सारखणी (ता. किनवट, जि. नांदेड) :
On The Way Foundation आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा – २०२६ यंदा सारखणी येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने सारखणी येथील सोना गार्डन येथे जागेची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी श्रीनिवासजी येईलवाड , ऋषिकेशजी चौधरी , अंकुशजी जाधव, नवीनजी वाघमारे तसेच सारखणी आणि वझरा (बु.) या दोन्ही गावांचे सरपंच उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करत आवश्यक सोयी-सुविधांची माहिती घेतली.
स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले ज्ञान प्रदर्शित करण्याची आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. लवकरच स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया आणि नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.
