अनुलोम किनवट टीमकडून पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट ; त्यांनीही केले अनुलोमचे कौतुक..!

 

मा. गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांची भेट घेताना अनुलोम ( किनवट ) टीम

किनवट | दिनांक २० जानेवारी

अनुलोम संस्थेच्या किनवट टीमने किनवट पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी मा. वाघमारे मॅडम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनुलोम संस्थेच्या सदस्यांचा शासकीय अधिकाऱ्यांशी परिचय करून देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा परिचय कार्यक्रम अनुलोमचे भागजनसेवक राजेंद्र जयस्वाल यांच्या माध्यमातून घडवून आणण्यात आला. भेटीदरम्यान मा. गटविकास अधिकारी वाघमारे मॅडम यांनी अनुलोम संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तसेच अनुलोमचे पदाधिकारी श्री. गजाननजी शिंदे आणि अमोलजी भारती यांना मी पूर्वीपासून ओळखते व अनुलोमच्या कामांची मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अनुलोम संस्थेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. भविष्यात विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवताना अनुलोम संस्थेची मदत घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी अनुलोमचे भागजनसेवक राजेंद्र जयस्वाल, मा. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाप्रमुख मारोती भरकड, अनुलोम संवादिनी अर्चनाताई बेडारी, रुखमिनीताई डाखोरे, यशवंत भोसले, मयुरेश वाडगुरे, ज्ञानेश्वर डाखोरे, प्रकाश गारोळे, अजय गिरी, विपुल आडे, सुखदेव कुरसंगे, सत्यपाल पारधी, आकाश गुजलवाड, आकाश वल्लेपवाड, मयुर सोनुले, परमेश्वर मुराडवार, पवन आंबेटवार, गौरव सरकमवाड, ओमप्रकाश आडे तसेच सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीमुळे अनुलोम संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक बळकट होऊन किनवट तालुक्यातील सामाजिक व विकासात्मक कामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“आम्हाला सिकलसेल अ‍ॅनिमिया संदर्भात किनवट तालुक्यातील काही गावांमध्ये विशेष उपक्रम राबवायचे आहेत. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अनुलोम संस्थेची मदत आम्ही नक्कीच घेऊ,”

असे मत मा. गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे मॅडम यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

येथे आपल्या जाहिराती दाखवण्यासाठी संपर्क करा. : 9552556331 , 9404902335

येथे आपल्या जाहिराती दाखवण्यासाठी संपर्क करा. : 9552556331 , 9404902335

نموذج الاتصال

Youtube Channel Image
LokPatrakar - लोकपत्रकार लोकांचा आवाज - आमची जबाबदारी
Subscribe