सारखणी येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन; भव्य शोभायात्रा व महाप्रसादाची तयारी
किनवट तालुक्यातील सारखणी येथे हिंदू एकतेचा संदेश देणारे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येत्या शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
या संमेलनात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्थळ नारायण नगरी, किनवट रोड, सारखणी (ता. किनवट) येथे निश्चित करण्यात आले आहे.
या संमेलनाला अनेक संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थितींमध्ये:
- महंत जितेंद्र महाराज (श्रीक्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम)
- श्री. सुरेश महाराज (यमाईकुंठा)
- श्री. गंगेश्वर महाराज (श्रीक्षेत्र मदनापुर महादेव मंदिर )
- ह.भ.प. बाळु महाराज काकानी (श्रीक्षेत्र माहूरगड)
तसेच, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारत धर्म जागरण प्रमुख श्री. शरददादा ढोले उपस्थित राहणार असून, ते हिंदू धर्म जागरणावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन “संघटित हिंदू – समर्थ भारत” या संकल्पनेतून करण्यात आले असून, परिसरातील सर्व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
